विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरीकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला “मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टिका करण्यामध्ये कमीपणा वाटत तर नाहीच, उलट एकप्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही. अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुध्दा आपल्या जंगलाला एव्हढी नांवे ठेवत नाही. अमेरिकेमध्ये आपल्या देशाला नांवे ठेवणे हे आपल्या आईला नांवे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशांत बरेच अडचणी आहेत. तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा कां ? हा अमेरीकन माणुस स्टॅनफोर्ड या प्रसिध्द विद्यापिठातील नोबेल पारितोषीक विजेता प्रोफेसर होता.अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगीतले, “तुम्ही भारतीय लोक एक चुक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इग्लंड, अमेरिकेशी करत असता. पण या देशांना स्वातंत्र मिळुन 200 वर्षे होऊन गेली आहेत. तुमच्या देशाला स्वातंत्र मिळुन फक्त 60 वर्षे झाली आहेत. त्यामुळे तुमच्या देशाची तुलना आमच्या देशाबरोबर करणे म्हणजे 10 वर्षांच्या मुलाची तुलना 30 वर्षांच्या माणसाबरोबर करण्यासारखे आहे.”
भारतातील आत्ताच्या अनागोंदिबद्दल ते म्हणतात, “तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर जी मंडळी सत्तेवर आली त्यांना अॅडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नव्हता. हा जॉबच त्यांच्यासाठी नवीन होता. अमेरिकेचा प्रेसीडेन्ट असो किंवा ब्रीटनचा प्राइम मिनिस्टर असो, त्यांना थोडा- फार तरी अॅडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असतो. पण अनुभव नसताना सुध्दा सत्तेवर आलेल्या लोकांनी उत्तम कारभार केला. लोकशाही नुसतीच रुजवली नाही तर बळकट केली. तुमचा भारत देश हा मिनी यूरोप सारखा आहे. भारतातील एका राज्यातुन दुसर्या राज्यात जाणे म्हणजे युरोपातील एका देशातुन दुसर्या देशात जाण्यासारखे आहे. युरोपमधे देश बदलला तर नुसतीच भाषा किंवा संस्कृती बदलत नाही तर सरकार, नियम, चलन सगळेच बदललते ( त्या वेळी युरो आस्तित्वात नव्हते ). पण भारतात तसे नाही. राज्य बदलल्यावर भले भाषा बदलत असेल. पण देश बदलत नाही. एव्हढी विवीधता असुनही तुमचा देश अजुनही एकसंध आहे हीच आमच्या दुष्टीने मोठी कौतुकाची गोष्ट आहे. युरोपीयन लोकांना हे अजुन जमलेले नाही. आता भारतामधे सत्तेवर येणार्या लोकांमधे अॅडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असलेले जास्त लोक येणे आवश्यक आहे. या ठिकाणी मतदारांनी उमेदवार निवडुन देताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.”
अमेरीकेतील एक प्रसिध्द सिनेटर आहेत. ते भारत द्वेष्टे म्हणुनच प्रसिध्द आहेत. त्यांची नुकतीच एक मुलाखत वाचायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटले आहे, “ भारतापुढे आज जी संकटे आहेत. आणि ज्या संकटांचा भारताला सामना करावा लगला, ती सगळी संकटे “एकमेवद्वितीय ( Unique ) आहेत.जगातील कोणत्याच देशाने अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दिलेले नाही. त्यामुळे या समस्यांना रेडीमेड सोल्युशन्स मिळणार नाहीत. भारतियांनाच या समस्यांवर तोडगा शोधुन काढावा लागेल. माझी खात्री आहे की भारतातील लोक यामधे यशस्वी होतील. एव्हढी असुनही भारताने जी प्रागती केली आहे ती खरोखरच कौतुकस्पद आहे.” हल्ली ते भारताविषयी बरेच चांगले बोलत असतात.असाच एक अमेरीकन इंजिनीयर भेटला. तो कांही वर्षे भारतात राहुन गेला आहे. भारतामधे प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी भावना अहे त्याबद्दल त्याने भावना व्यक्त केली, “तुमच्या देशामधे सरकारने प्रत्येक गोष्ट करावी अशी लोकांची अपेक्षा आहे. थोडक्यात तुम्ही लोक सरकारवर फार अवलंबुन आहात. आमच्याकडे असे नाही. आम्ही कमीत कमी सरकारवर अवलंबुन असतो. पुष्कळशा गोष्टी आमच्या आम्ही करत असतो. तुम्हाला आमच्याकडे जी शिस्त, उच्च दर्जाची सार्वजनीक स्वच्छता, वाहतुकिच्या नियमांचे उत्तम पालन, व्यवहारात प्रामाणीकपणा व पारदर्शीपणा , करप्शन नसणे या ज्या गोष्टी दिसतात त्या सरकारने कडक कायदे केले म्हणुन दिसत नाहीत. उलट आमच्या सरकारचे म्हणणे आहे की कायदे करुन किंवा कायद्याचा बडगा दाखवुन लोकांना शिस्त लावता येत नसते. उलट लोकांनी आपणहुन कायदे कानुन पाळले तरच ते उपयुक्त ठरतात. आम्हाला लहानपणापसुनच कायदे हे आमच्या फायद्यासाठी व संरक्षणासाठी केले आहेत, तसेच नगरीक म्हणून आमची काही कर्तव्ये असतात हे मनावर ठसवले जाते.”
मी मुद्दामुनच अमेरीकन लोकांचे उदाहरण दिले आहे. कारण अमेरिकेसारख्या प्रागत राष्ट्रातील लोक भारताकडे कोणत्या नजरेने बघत असतात आणि आपण कोणत्या नजरेने बघत असतो हे कळावे म्हाणून.येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळुन 70 वर्षे होत आहे. त्यानिमित्त आपण आपल्या देशाविषयी काय विचार करत असतो याचा आढावा घेणे जरुरिचे आहे. आपला देश कसाही वेडावाकडा असला तरी तो आपला देश आहे. आपल्या देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय केले व काय करु शकतो याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे. सरकारने काय करायचे यापेक्षा मी रस्यात थुंकायची, रस्यात घाण किंवा कचरा टाकण्याची,बेशिस्त वागण्याची, वाहतुकिचे नियम तोडण्याची, पकडले गेल्यास पोलिसाला चिरिमिरी देउन सुटका करुन घेउन करप्शनला बढावा देण्याची, इतरांशी उध्धटपणे वागायची, संधी मिळेल तेव्हा डल्ला मारायची माझी सवय केव्हा मोडणार? आपणच घाण करायची आणि ती उचलायला सरकारी माणुस येइल याची वाट बघायची. नाहीतर परदेशी पलायन करायचा विचार करायचा. असे हे किती दिवस चालणार? याचा आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा, कोरिया, तैवान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी जी प्रागती केली आहे ती तिथल्या जनतेने केली आहे, सरकारने नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.प्रगत भारत निर्माण करणे हे आपल्या हातात आहे, सरकारच्या नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. आणि सरकार म्हणजे कोण? ते कोणी परग्रहावरून आलेले लोक नाहीत. ते आपल्यातीलच लोक आहेत. याचे भान ज्याचे त्याने ठेवावे हीच अपेक्षा.चला तर! आपण सगळे मिळुन प्रगत भारत निर्माण करुया !
Followers
Wednesday, 16 August 2017
विचार तर करा
Sunday, 6 August 2017
Parents
yogayog
*भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला*.
मोठा आँफीसर झाला.
आणि भारतात आला.
घरी जायची ओढ होती.
*पण कंपनीच्या लोकांनी* *विमानतळावरच घेरले*
*आणि भव्य सत्कार केला*.
सजवलेल्या गाडीत बसवले.
आणि भव्य मिरवणूक निघाली.
एका फाइव्ह स्टार हाँटेल समोर थांबले.
*साहेब आज इथ थांबा*.
*सगळ्यांचा आग्रह*.
*साहेब गाडीतून उतरले*.
*आजूबाजूचे लोक फुले उधळत होते*.
काय सांगाव ते कौतुक.......
*साहेब दरवाजा पर्यत आले*.
दरवाजा जवळ एका डोअरकिपर म्हाताऱ्याने नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला. ..
दरवाजा उघडला. साहेब आत शिरले..
*आणि* .
*विजे चमकावी तसे चमकले*....
*आणि*
*तक्षणी माघारी फिरले*. ...
*दरवाजा जवळ आले*...
*डोअर किपरने खालची मान वर केली* ...
साहेबांची आणि त्याची नजरा नजर झाली.
*आणि आणि* ...
*दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले*. .
*साहेब अश्रू ढाळीतच त्या डोअरकिपरच्या पायावर झुकला*.
*आणि नकळतच तोडांतून शब्द बाहेर पडले*....
बाबा.......बाबा
तुम्ही इथे.....
*आणि बराच वेळ बापलेक गळ्यात गळा घालून रडत राहिले*.
बाजुच्या लोकांना ही गहीवरून आले.
*आपल्या मुलाने परदेशी जावे*.
*मोठे व्हावे यासाठी हा बाप नोकरी करत होता*.
ओव्हर टाईम करत होता.
*पोटाला पोटभर खात नव्हता पण मुलासाठी पैसे पाठवत होता*.
तो रिटायर झाला.
पैसा कमी पडू लागला.
म्हणून या हाँटेलमधे डोअर किपरची नोकरी करायला लागला.
*दरवाजात कोणीही आले तरी मान खाली घालून मुजरा करायचा*.
आणि दरवाजा उघडायचा हा त्याचा नियम ठरला.
*आणि आज तोच मुजरा त्याच्या मुला साठी होता*.
आयुष्यभर दुसऱ्याला मुजरा करणाऱ्या हाताने त्याने मुलाला घडवले.
*मला सांगा यात श्रेष्ठ कोण*
तो साहेब की तो डोअरकिपर
*तो आँफीसर की नोकर*
तो मुलगा की बाप....
*यशाची शिखरे चढणार्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या साठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो*.
तुमच्या जीवनाच्या आणि करिअरच्या इमारतीचा पाया हा बाप असतो.
*पाया कधी दिसत नाही पण त्या शिवाय इमारत उभी राहू शकत नाही*.
हा बाप घरात कायम
वेठबिगारी हमालासारखा जगतो.
राञन् दिवस कष्ट करतो.
कोणी शेतात.
कोणी आँफीसात.
कोणी रोजंदारीवर.
तो फक्त राबत असतो.
*त्याच्या जीवावर मुलं शिकतात. मोठी होतात. पुढे जातात. आणि त्यालाच म्हणतात. तुमच्या पेक्षा आम्ही कतृत्ववान आहोत. काय केले तुम्ही* ?
आपल्या बनियनला भोक पडू नये यासाठी स्वतःच्या बनियनची भोक विसरणारा तो बाप.
आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वतः घामाने भिजनारा बाप.
*आपल्याला चांगले बुट मिळावे म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप*.
स्वतःची स्वप्न तुमच्या डोळ्यांत बघणारा तो बाप..
*लहानपणी आजारी पडला तर पाठीवर घेऊन रात्री अपराञी दवाखान्यात नेणारा तो बाप*..
तुमचे शिक्षण पुर्ण करणारा तो बाप..
पाहिजे तेव्हा पैसे देणारे ATM मशिन म्हणजे बाप...
*ज्याला बाप आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळतात*.
बाप आणि बापाच काळीज समजून घेतले पाहिजे.
बाप
बोलेल
मारेल
शिक्षा करेल
पण आपल्या चुका सुधराव्या म्हणून....
*आई चुक पदरात घेईल पण बाप चुक सुधरायला लावेल*.
ज्या घरात बाप आहे त्या घराकडं कोणी वाईट नजरेनं पाहत नाही
*पण जिथे बापाची छाया नसेल त्या घरावर कोणीही दगड मारत*.
माझ्या एका मिञाचे वडील गेले..
जिवंतपणी त्या बापलेकांच कधीच पटले नाही. पण जेव्हा काही *दिवसांनी मी त्याला भेटलो त्या वेळी बापाच्या आठवणीने तो धायमोकलून रडला. दत्ताभाऊ, ज्या वेळी वडील होते तेव्हा त्यांची किंमत कळली नाही. मी कायम नावं ठेवत होतो. कधी ऐकल नाही . पण आता ज्या वेळी जगाच्या बाजारात जातो*. *टचके-टोमणे खातो. आज मला त्यांची उणिव भासते*.
आज माझे वडील असते तर अस बोलले असते...
*आज वडील असते तर हा मार्ग सांगितला असता*.
वडीलांनी काही नको करू दे. पण घराला एक आधार होता .
*मला जेव्हा विचारले जाते*
जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो
*जगात यशस्वी कोण* ?
*ज्याला आई बापाची कींमत कळाली तो*
जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो
आणि
*जगात नालायक कोण*?
*ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले*.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.
*मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या* *मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात*
खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
👆*तुम्ही हा मँसेज ३ गुरूप वर पाठवा👆👆
*वडिलांना समर्पित*💐
Friday, 4 August 2017
Just dial
टेलिफोनवर मोफत पत्ते सांगणारी कंपनी...Just dial
एखादी भन्नाट कल्पना एखाद्याला काय देऊ शकते याचे उदाहरण.
8000 कोटींच्या कंपनी च्या मालकाची हि प्रेरणादायी कथा.
ही कथा आहे जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या एका तरुणाची - 'व्ही.एस.एस.मणी'ची! त्याचा जन्म एका पारंपारिक मध्यमवर्गीय तमिळ कुटूंबात झाला. वडील कोलकत्ता या शहरात नोकरी करत होते तर आई गृहिणी होती. मणी चार बहिण भावंडांमध्ये सगळ्यात मोठा. घरात शिक्षणाचे वातावरण. त्यामुळे मुलांनी शाळा कॉलेजात मन लाऊन अभ्यास करावा, भरपूर गुण मिळवावेत आणि चांगली सुरक्षित नोकरी पटकावावी हा नोकरदार संस्कार. त्याच सगळ बालपण कोलकत्त्यात गेल.
पुढे वडील नोकरीनिमित्त दिल्लीला आले, सगळ कुटुंब दिल्लीला हलवलं. दरम्यान मणीने पदवी पूर्ण केली होती आणि चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घेत होता. हे शिक्षण चालू असताना वडिलाची नोकरी गेली. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. मणीला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी त्याने एका यलो पेजेस कंपनीत सेल्सपर्सन म्हणून नोकरी सुरु केली.
यलो पेजेस म्हणजे उद्योग-व्यवसायांची नाव, पत्ता व फोन नंबर यांची यादी असलेले एक मोठे जाडजूड छापील पुस्तक. प्रत्येक मोठे शहर किंवा जिल्ह्यासाठी स्वतंत्र पुस्तक. जर एखाद्याला उद्योग व्यवसायाचा पत्ता हवा असेल तर तो त्या यादीत शोधणार.
या कामासाठी मणीला अनेक ग्राहकांना भेटावे लागायचे. त्यातील एका ग्राहकाने सुचवले की पत्ता शोधणार्यासाठी हे किती कटकटीचे काम आहे. त्यापेक्षा असा हवा असलेला पत्ता आपल्याला फोनवर मोफत मिळाला तर?
बस्स! याच एका कल्पनेवर मणी, तो ग्राहक आणि एक मित्र अशी तिघांनी १९८९ साली आस्क मी नावाने कंपनी सुरु केली. माहिती हवी असलेल्या ग्राहकाच फोन आला की माहिती देताना जाहिरातदाराच्या माहितीला प्राधान्य द्यायचे. जाहिरातीतून उत्पन्न मिळणार. कंपनीची सुरवात तर चांगली झाली, पण लवकरच भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आली आणि कंपनीला त्याचा फटका बसला. तोटा सुरु झाला. भागीदारांबरोबर मतभेद होत होते, शेवटी तो १९९२ साली त्यातून बाहेर पडला.
पुढे चार वर्ष त्याने इतर धडपड केली. पण रात्रंदिवस मात्र स्वतःची टेलिफोनवर मोफत पत्ते सांगणारी कंपनी सुरु करायची याची स्वप्ने पाहत होता. त्याचे आदर्श होते धीरूभाई अंबानी आणि टाटा! त्यांच्यासारखच एक दिवस आपण पण खूप मोठ बनायचंच हा त्याचा निर्धार पक्का होता. लाखो लोक आपल्या कंपनीची सेवा घेत आहेत अस भव्य चित्र तो तपशीलवार रंगवायचा.
१९९६ ला त्याने मुंबई गाठली आणि ५०,००० रु. गुंतवून जस्ट डायल नावाने कंपनी सुरु केली. ग्राहकांच्या सहज लक्षात राहील असा टोल फ्री नंबर मिळविला ८८८-८८८८. भांडवल खूपच कमी असल्याने जागा, फर्निचर, कॉम्प्यूटर, सगळ-सगळ भाडे तत्वावर घेतल. गल्लीबोळात माणसे पाठवून वेगवेगळ्या उद्योगधंदे व्यवसायांची माहिती गोळा केली. खूप संघर्ष करावा लागला. पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. पण कंपनी बंद करण्याचा विचार कधीच केला नाही. नेटाने, चिवटपणे तो लढत राहिला.
हळू हळू कंपनीची कीर्ती माऊथ पब्लिसिटीने सगळीकडे पसरू लागली तस तशी कंपनी पण विस्तारत गेली. कंपनी वाढवताना मणीने फक्त एकाच गोष्टीचा विचार केला, तो म्हणजे - मी ग्राहकाला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देऊ शकतो? रोज मी त्यात काय सुधारणा करू शकतो?
फक्त या सूत्रावर कंपनी इतकी मोठी झाली की २०१३ साली कंपनी शेअर बाजारात नोंदवली गेली. अमिताभ बच्चन सारखी हस्ती त्यांच्यासाठी ब्रँड अँबेसिटर म्हणून काम करू लागली. २०१४ मध्ये कंपनीचे मूल्य होते ८००० कोटी रुपये! आता अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांचा कारभार पसरला आहे. ती आता एक बहुराष्ट्रीय कंपनी बनली आहे.
१९९६ ते २०१४ - अठरा वर्षात ५० हजार ते ८००० हजार कोटी रुपये आणि कल्पना काय तर गल्लीबोळातील उद्योग व्यवसायाची माहिती फोनवर मिळणार!एखादी भन्नाट कल्पना एखाद्याला काय देऊ शकते याचे अप्रतिम उदाहरण.
Good
पापा पापा धरती किसने बनाई?
बेटा भगवान ने बनाई।
आसमान किसने बनाया?
भगवान ने।
सितारे किसने बनाए?
भगवान ने।
हमें किसने बनाया?
भगवान ने।
पेड़-पौधे कैसे उगते है?
भगवान की मर्जी से।
लोग कैसे मरते है?
भगवान की मर्जी से।
लोग पैदा कैसे होते है?
भगवान की मर्जी से।
रोशनी कैसे मिलती है?
भगवान की कृपा से।
अँधेरा कैसे हो जाता है?
भगवान की इच्छा से।
बेटा इतने सवाल मत पूछो , इस धरती पर, ब्रह्माण्ड में जो भी कुछ होता है सब भगवान की मर्जी से
होता है।
एक दिन बच्चे के विज्ञान टीचर बच्चे के घर आते है। देखिये वर्मा जी, आपका बच्चा पढने में बहोत कमजोर है , पढ़ाई-लिखाई में ध्यान ही नहीं देता है।
टेस्ट में सवाल पूछा गया ,
बल्ब रौशनी कैसे देता है?
जवाब में लिखा, भगवान की मर्जी से।
टेलीफोन किसने बनाया?
भगवान ने बनाया।
धरती पर दिन और रात कैसे होते है?
भगवान की मर्जी से।
माफ़ कीजिये बताते हुए अच्छा तो नहीं लग रहा लेकिन
आपका लड़का फेल हो गया है।
वर्मा जी ने गुस्से से कांपते हुए लड़के को बुलाया , डांटते हुए, क्यों बे? हमारे लाड-प्यार का नाजायज फायदा उठाता है, पढ़ाई-लिखाई में दिमाग क्यों
नहीं लगाता है? और दो तमाचे रसीद करते हुए बोले,
कमबख्त फेल हो जाएगा तो जिन्दगी में क्या करेगा?
और बेचारा बच्चा समझ ही नहीं पाया कि उससे
गलती कहाँ हुई?
काश! वर्मा जी ये समझ पाते कि बच्चे की जिज्ञासा को
अगर वो भगवान से तुष्ट न करते, तो बच्चा उन सवालों के जवाब विज्ञान में ढूंढता।
उस बच्चे की सारी कल्पनाएं , जिज्ञासाएं ,
खोजी प्रवृत्ति तो एक भगवान पर आकर ही खत्म हो
गयीं, भला इसमें उस बच्चे की क्या गलती
है जो उसे विज्ञान की समझ न आई ?
क्या आप भी चाहते है कि आपके बच्चे फ़ैल हो ?
नहीं ना ?
तो फिर आपके बच्चों को विज्ञान की कहानियां सुनाओ... देवी-देवता और भगवान की नहीं ! उन्हें विज्ञान का रहस्य समझाओ, जूठी-मुठी कहानिया नहीं।
उन्हें तर्क करना सिखाओ...
विज्ञान को धर्म बनाओ... आपका बच्चा अवश्य तरक्की करेगा।
अपना विकास स्वयं करो, आपका उद्धार आपको खुद ही करना होगा।
🖌📚🖌📚🖌📚🖌