Followers

Monday, 1 May 2017

महाराष्ट्रा "बाबत माहिती

▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪

👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा -  मराठी

👉राजधानी -  मुंबई
👉 उपराजधानी - नागपूर
👉ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
👉 सांस्कृतिकराजधानी- पुणे

👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 जेवण फेमस जिल्हा - कोल्हापूर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - आष्टा  ( सांगली )🔴
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण संगणीकृत     जिल्हा -नांदेड
👉 आश्रम शाळेचे वेळेवर पगार होणारा जिल्हा लातूर
👉 चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी - कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी - मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

अस काहीतरी पाठवा  ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल
जास्तीत जास्त शेअर करा▪

Bad patch

*बॅड पॅच- एक संघर्ष...*
HTTP://sgpawarstudycenter.blogspot.in
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात

 करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,

 नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,

 व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,

 पैशांची बिकट  वाट लागते...नड येते

आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो...

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
 काय बोलतो,
काय करतो,
 काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
 आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी,कलाकार,राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही.मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला   काही शिकवून जातो.

 यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!

संघर्षातून  जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो . शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात , यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!!
               तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
               तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः  "कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
             
मी गरीब आहे. पैसा नाही,हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा,मजबुर नाही.
             
ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते.....
             
 चांगल्या कामात निर्लज्ज व्हा.मान, सन्मान, इगो,मोठेपणा,अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच.
             
संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका....
               
  *स्वताच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा बस्सससससससस*
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩

Good

!!

      *तात्वीक  भांडण सर्वांशी होते ,पण  "शत्रुत्व" कुणाशीचं   ठेवू नाही...*
      *.खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..*
     *.एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.*
     *."अहंकार" हाच  या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण  "बाळगुन जगू" नये..*
       *.शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.*
      *.आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद "  उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.*
       *.आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.*
    *."एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे*
    *क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम ध्या*


🌠🌸🌠🌸🌠🌸🌠

1 मेपासून RERA लागू होणार!*_

👉 _*1 मेपासून RERA लागू होणार!*_

1 मे पासून रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (RERA) लागू होणार असून त्याअंतर्गत नवीन घर खरेदी करताना 1 मेपासून नवीन बदल होण्याची शक्यता आहे. या नवीन कायद्यामुळे बिल्डरांच्या मनमानीला चाप बसणार आहे.  त्यामुळे जर तुम्ही घर घेऊ इच्छित असाल तर 1 मे 2017 ची वाट पहा व त्यानंतर घर खरेदी करा.

_*काय बदलणार RERA अॅक्टमुळे?*_

👉 रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट लागू झाल्यानंतर बिल्डरांशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी  प्रत्येक राज्यात स्टेट रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाची स्थापन केली जाईल.

👉 घराचा ताबा घेण्यासाठी ग्राहक बिल्डरला एक वर्षांच्या आत लेखी स्वरुपात संपर्क करु शकतो.

👉 बिल्डर योजनेत कोणताही बदल करु शकत नाही. जर नियम बदलण्याआधी बिल्डरला ग्राहकाची लेखी मंजुरी घेणे आवश्यक आहे.

👉 बिल्डरांना 70 टक्के रक्कम जी ग्राहकांनी दिली आहे, ती एकाच अकाऊंटमध्ये ठेवून सुरु असलेल्या प्रकल्पात गुंतवावे लागतील.

👉 RERA कायद्यानुसार, रिअल इस्टेट प्रकल्पाचा प्रत्येक टप्पा हा एक वेगळा प्रकल्प मानला जाईल. जर एखाद्या बिल्डरने 5 टप्प्याचा प्रकल्प सुरु केल्यास त्याला 5 वेळा नोंदणी करावी लागेल.

👉 प्रत्येक बिल्डरला प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. यामध्ये जागा, सरकारी आदेश, किंमत, बिल्डिंगचा लेआऊट इत्यादी माहिती सांगणे आवश्यक आहे.

👉 RERA च्या नियमानुसार, ग्राहकांना कार्पेट एरिया सांगणेही आवश्यक असणार आहे.

👉 RERA लागू झाल्यानंतर जर प्रकल्पाला उशीर झाला तर बिल्डरला हफ्त्याच्या व्याजाची काही रक्कम ग्राहकांना द्यावी लागेल.

👉 RERAच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जास्तीत जास्त 3 वर्षांचा कारावास आणि दंड लागू शकतो.

👉 प्रत्येक बांधकाम सुरु असलेला आणि त्यापुढील प्रकल्प हा RERA च्या कार्यकक्षेत येईल. जर कोणत्याही बिल्डरने त्याच्या प्रकल्पांची नोंद केली नाही, त्याला संबंधित प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या 10% टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागू शकतो.


🙏🌺🌺🌺🌺🌺🙏

Doctor

ब्रँडेड औषधांच्या नावाखाली डॉक्टर लुटतात, असं ज्यांना वाटतं, त्यांनी हॉटेलात गेल्यावर मिनरल वॉटर ऐवजी नळाचं पाणीच् मागावं..
किंवा जर ड्रिंक्स घेत असाल तर ब्रँडेड दारूऐवजी 'देशी दारू' प्यावी.. दोन्हीत एकच molecule असतो.. दोन्हीही 42.8%v/v  Ethyl alcohol च् आहेत.. मग उगीच कशाला महाग महाग दारू पिऊन पैसे वाया घालवायचेत.? हो ना?

जो फरक टपरीवर भजी खाण्यात आणि मोठ्या हॉटेलात भजी खाण्यात असतो तोच फरक जेनेरिक आणि ब्रँडेड मेडिसिनमध्ये असतो.. टपरीवरची भजी स्वस्त असली चविष्ट वाटली तरी ती बनवताना raw मटेरियल किंवा तेल काय प्रतीचं वापरतात हे आपल्यालाही माहिती आहेच..

Molecule जेनेरिक आणि ब्रँडेड औषधामध्ये एकच असले तरी efficacy मध्ये प्रचंड फरक असतो .. Ceftum च्या ४ गोळ्यात इन्फेकशन कंट्रोलला येते .. पण जेनेरिक च्या १० गोळ्या घेतल्या तरी ओ की ठो फरक पडत नाही ..नंतर डॉक्टर्सच्या औषधाला गुण नाही म्हणून डॉक्टर्सनाच बडवायला मोकळे..

मुख्य raw मटेरियल काय quality चे वापरतात यावर results ठरतात .. ब्रँडेड चे raw मटेरियल युरोप किंवा इतर ठिकाणावरून आयात केलेले असते त्यामुळे महाग असते पण दर्जेदार असते, त्यात परत त्या औषधाचा research चा खर्च ऍड होतो..

सरकारने जेनेरिक ची सक्ती केल्यास sub-standard मालाची भारतात एक मोठी बाजारपेठ तयार होईल..

ज्या लोकांकडे पैसे आहेत त्यांना दर्जेदार औषधाचा लाभ का घेऊ देऊ नये ? ..ज्यांना जेनेरिक हवे, त्यांनी जेनेरिक घ्यावी .

चौकात डोसा ३० रुपयाला मिळतो .. 'वैशाली'त १०० रुपयाला मिळतो ..डोसा हा डोसा च आहे ना ? ..मग 'वैशाली'त जास्त पैसे घेऊन लोकांना लुटले जाते का? ..Qualityचा विषय पण पैशाच्या पलीकडे जाऊन असतो, हा विचार व्हावा..

बरं ..औषधांच्या किंमती सरकारच्याच नियंत्रणाखाली असतात ना? मग ४ रुपयांची गोळी ४० रुपयाला मिळते म्हणून डॉक्टर्सना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे ..४० रुपये किंमत डॉक्टर्सनी ठरवलीय का ?

आणि प्रत्येक गोष्ट किंमती वरच जज् करायची झाली तर आपल्याकडे नवीन संशोधन येणारच नाही.. कारण त्याची पण किंमत कॉस्ट मध्ये add होते .. जेनेरिकची सक्ती करून लॉन्गटर्म मध्ये आपण आपले नुकसान करून घेतो आहोत..

**

तोंडाच्या अल्सर साठी Neurobion forte ही व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ची गोळी द्यायची असेल तरी डॉक्टरला खालील prescription द्यावे लागेल-
1.thiamine mononitrate 10 mg
2. riboflavin 10 mg
3. pyridoxine hydrochloride 3 mg
4. cyanocobalamin 15 mcg
5. nicotinamide 45 mg
6. calcium pantothenate 50 mg.

गमतीचा भाग जाऊ द्या पण जर सरकारने डॉक्टरांना जेनेरिक प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची सक्ती केलीच, तर त्यात शेवटी एक ओळ आवर्जून टाकावी.

*"हे प्रिस्क्रिप्शन जेनेरिक असून रुग्णाला कुठल्या कंपनीचे, ब्रँडचे अथवा क्वालिटीचे औषध मिळेल, यावर डॉक्टरांचे काहीही नियंत्रण नसून, गुण न आल्यास कृपया औषध कंपनीशी संपर्क साधावा."*

किंवा खालील प्रमाणे consent घ्यावी..

I Dr ________, would like to inform you that I am prescribing you medicines in the generic
name  according to the guidelines of the MCI , WHO and various govt bodies etc in your best interest and to my best knowledge.
I would like to inform you that there are basically two types of  drugs manufactured one innovator or research molecule and the other group called generic drugs.
I would also like to inform you that there is one innovator drug Brand and many generic brands .
The innovator drugs are generally expensive if it is not in the essential drug  price control.
I would like to also inform you that I am not liable for the side effects ,reaction etc which these drugs may cause other than the known side effects.
I am also not liable-
For the efficacy of the drug
For the quality of the drug
For the  potency of the drug
For the impurities that may be present
For any resistance that you may develop
Whether they are counterfeits
Whether there are any other adverse reaction
It is the responsibility of
MCI
FDA
Drug Company
The dispensing pharmacist, pharmacy or hospital and policy makers.

I have no role in the selection of these drugs nor can I influence the hospital, pharmacy, pharmacist, patient over the choice of drugs.

I am not liable for Any medico legal cases that may occur in the future concerning the concerned drugs and all such queries etc should be directed to the above responsible parties.

It is entirely your responsibility which drug brand you choose and I will not be liable for the same.
For full information on innovator drugs brand name and generic company there are lots of online website were you can get the information.or you can ask the pharmacist who will/should give you the said info.

If after reading this you give me consent then I will prescribe you medicines with a Belief  and  knowledge that it will
/ may help you in the course  of treatment .
Please mark below what type of drugs you would prefer. .

Thanking you. For placing your trust and health in my hands.

Dr.___________
Degree:_______                      
Sign:
Reg no:________
Council: _______                          

Patient's name:
______________                                                Date:__________

**

Good

*संस्कार.....*

प्रसंग पहिला....
      माधव उठला आणि आईच्या रूम मध्ये गेला.. तिच्या कपाळाला हाथ लावून पाहीला तर अंग चांगलच तापल होत... रात्रभर खोकल्याची उबळ तिची चालु होती.. त्याच्या मागे मालतीही आली.
         तिला बघुन तो म्हणाला "मालती मी आज ऑफिसला जात नाही.. आईला घेवून दवाखान्यात जातो.. तू चिन्मयला तयार कर.. जाता जाता त्यालाही शाळेत सोडून जाईल.."
        " मी ही थांबू का?..मी पण नाही जात ऑफिसला" मालती म्हणाली.
         तसा माधव म्हणाला "अग असे दोघांना घरात थांबायची आवश्यकता नाही ... तू जा ऑफिसला... आईचे खायचे प्यायचे बघुन जा आणि तशी गरज लागल्यास मी तुला बोलावून घेईन.."
        नुकताच उठलेला चिन्मय दारात उभा राहून त्यांचे संभाषण ऐकत होता.. त्याला पाहुन मालती उठली आणि पुढच्या तयारीला लागली...
         माधवने आईला उठवले...तिची पांघरून आवरता आवरता तिथेच उभ्या असलेल्या चिन्मयला म्हणाला "चिन्मय, आज आज्जीला बर नाही तिला त्रास द्यायचा नाही... चल आवर लवकर मी तुला शाळेत सोडतो आणि हो आईला सांग आज्जी उठलीय     तिचा चहा आण म्हणाव..."
    चिन्मय आईला निरोप द्यायला गेला तस त्याने आईला म्हंटल
           "तुझा ताप आणि खोकला अजुन कमी नाही झालाय... तू आटप आवर... आपण सकाळी सकाळी दवाखान्यात जावुन येवू .. "
          आई ने फक्त बर म्हंटल आणि आपल आवरायला घेतल.
            इकडे मालतीने स्वतःची, चिन्मयची तयारी केली... डबे भरले... माधवचे, आईचे खायचे तयार करून ठेवले... माधवला फळ, ज्यूस आणि इतर आईचे पथ्याचे कुठे ठेवले ते सांगितले..आणि ती ऑफिसला निघाली...
         जाता जाता आईच्या रूम मध्ये डोकावून तिला म्हणाली "आई, काहीही लागल तर फोन करा... येते मी.."
       चिन्मय तयारच होता ...
       माधव आईच्या रूम मध्ये गेला... तिला हलकेच हाथाने धरून गाडीपाशी आणले..चिन्मयला गाडीचे मागचे दार उघडायला लावले..
      आईला मागच्या सिट वर बसवले... खालीवाकुन तिचे पाय हाथाने उचलून अलगद गाडीत ठेवले आणि गाडीचा दरवाजा बंद करता करता चिन्मयला म्हणाला
       "जा आज्जीची पाण्याची आणि औषधाची पिशवी आत टेबलावर ठेवली आहे ती घेवून ये...तसा चिन्मय पळत जावून ते घेवून आला, तोपर्यंत माधवने गाडी बंगल्याच्या दरवाजात आणून उभी केली होती..
         चिन्मय आल्यावर तो म्हणाला "चिन्मय आज पुढे नाही बसायच ... आज आज्जी शेजारी मागे बस.."
         एरवी पुढे बसण्यासाठी हट्ट करणारा चिन्मय आज चुपचाप मागे बसला आणि ते रवाना झाले..
          दुपारी चिन्मय शाळेतून घरी आला तेंव्हा माधव आईच्याच रूम मध्ये बसून आपल्या लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत बसला होता..
           चिन्मयच्या मागे लगोलग मालतीही आली... तिला इतक्या लवकर बघुन दोघांनाही आच्छार्य वाटले.
          पण ती म्हणाली.
          " काय करू माझ ऑफिसात लक्ष्यच लागत नव्हतं म्हणून आले लवकर.. "
         तिने आईच्या कपाळाला हाथ लावून पाहिला ... ताप कमी झाला होता... खोकलाही आता नव्हता.
        थोड्या वेळात आईही उठली... थोड़ी फ्रेश वाटत होती.. तिचा नेहमीच्या हसरा प्रसन्न चेहरा बघुन सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसु पसरले..
       चिन्मयला बघुन आज्जीने त्याला जवळ बोलावले; तसा तो टुणकन उडी मारून आज्जीच्या मांडीवर जावून बसला... आज सकाळ पासून पहिल्यांदा आज्जीने त्याला जवळ घेतले होते.
     तो आज्जीला बिलगला तसे सगळे प्रसन्न खुदकन हसले..
आता प्रसंग      दूसरा......................
           सहा महिन्यानंतर,
        माधव कामानिम्मित्त दिल्लीला गेला होता... त्याची आई गावी गेली होती...
      घरात फक्त चिन्मय आणि मालती दोघच...
           त्यादिवशी सकाळी सकाळी चिन्मयला जाग आली, 'अरे सहा वाजून गेले अजुन आई कशी उठली नाही..'
तो मनातल्या मनात म्हणाला..
        आईला उठवण्यासाठी त्याने तिला हाथ लावला तर तो चपापलाच... तिला जाम ताप होता...
         त्याला काय करावे सूचना.. कसबस आईला त्याने उठवल... तिला म्हणाला "आई तुला ताप आहे....चल मी तुला दवाखान्यात घेवून जातो.."
          तशी मालती म्हणाली "चिन्मय राहु दे, मी जाईन थोड्यावेळाने, तू आटोप लवकर.. मी रामभाऊंना सांगते तुला सोडायला शाळेत..."
           "नाही आई मी आज शाळेत नाही जाणार... बाबा पण नाहीत... तूच आटोप आपण दवाखान्यात जावू... मी डॉक्टरांना फोन करतो.."
          अस म्हणत तीच पुढच काही ऐकण्याच्या आत तो बाहेर पळाला... आईच्या फोन मधून डॉक्टरांना फोन लावला... दूसरा फोन बाबांना केला...
             तसा माधव चिंतित झाला... त्याने फोन मालतीला द्यायला सांगितला..
           "काय ग, काय झाल..?"
            "काही नाही कणकण आहे... रात्री गोळी घेतलीय होईल ठीक.. पण आज ऑफिसल नाही जात.." मालती क्षीण आवाजात म्हणाली.
          "कणकण नाही बाबा, चांगला ताप आहे..." मालतीच्या अंथरुणाच्या घड्या घालता घालता तो माधवाला फोन वर ऐकू जाव म्हणून जोरात ओरडला..
          "ठीक आहे एक काम कर, मी रामभाऊंना सांगतो ते तुला दवाखान्यात घेवून जातील आणि तसेच चिन्मयलाही शाळेत सोडतील... तू तयार रहा...डॉक्टरांना ही फोन करतो... आणि तसाही मी संध्याकाळच्या फ्लाईटने परत येतोच आहे...आणि ऐक ज़रा चिन्मयला फोन दे..." माधव म्हणाला.
           चिन्मयने फोन घेतला आणि माधव काही म्हणायच्या आत चिन्मय म्हणाला " बाबा मी शाळेत जात नाहीये.. आईला घेवून दवाखान्यात जातो... आणि ड़ॉक्टर काकांना मघाशीच फोन करून सांगितलय मी..."
           माधव फक्त एवढच म्हणाला "बर ठीक आहे, आईची काळजी घे ... दंगा करू नको.."
           माधवने मग त्याचा ड्राइव्हर रामभाऊ, डॉक्टर यांना फोन करून सांगितले आणि आपल्याला कामाला लागला..
          संध्याकाळी तो घरी आला...
घर निटनेटके स्वच्छ होते... चिन्मयने कुठलाही पसारा केलेला दिसत नव्हता, दिवा बत्ती झाली होती...मालती डोळे मिटुन आपल्या रूम मध्ये पडली होती आणि चिन्मय तिथेच तिच्या शेजारी अभ्यास करत बसला होता...
           त्याची चाहुल लागताच मालतीने डोळे उघडले... चिन्मय पळत माधवला बिलगला...
         माधवने मालतीच्या कपाळाला हाथ लावून पाहिले ताप कमी होता..
         एवढा वेळ हिरमुसलेला चिन्मय आईचा हसरा चेहरा पाहिल्यावर खुदकन हसला आणि आईच्या कुशीत जावून बसला..
            माधवने मग त्याला खेळायला पाठवले आणि तो मालती शेजारी येवून बसला..
           मालतीने मग सकाळ पासूनच सगळ माधवला डिटेल मध्ये सांगितल..
         चिन्मयने पहिल डॉक्टरला फोन केला.. मग रामभाऊंना फोन करून गाडी तयार करायला सांगितली..
            स्वत:च आपल आपल आवरल...आईसाठी घरकामाच्या मावशी कडून चहा करून आणून दिला.
         मला हाथाला धरून गाडी पर्यंत घेवून गेला....गाडीत बसायच तर म्हणाला मागच्या सिट वर बस....
         स्वतः दरवाजा लावला आणि पुढे न बसता माझ्याशेजारी मागे येवून बसला..
         Vडॉक्टर कडून निघाल्यावर रस्त्यात गाडी थांबवायला लावून डॉक्टरांनी दिलेली औषध रामभाऊंना जावून आणायला लावली...
         घरी आल्यावर, बिलकुल दंगा नाही,टीवी नाही... स्वयंपाकवाल्या मावशींनी जे दिले ते चुपचाप खाल्ल आणि दुपारी माझ्यापाशीच झोपला..
          उठल्यावर दूधही आपल आपल घेतल... मला चहा औषध आणून दिली आणि येथेच अभ्यास करत बसला.
         ते सांगताना मालतीच्या डोळ्यात पाणी येत होत..
             तसा तिला जवळ घेत माधव म्हणाला..
          "मालती, मी तुला म्हणाला होतो ना, संस्कार करावे लागत नाही ते पेरावे लागतात...ते आपोआप उगवतात....
                           आपण जे पेरू ते संस्कार महत्वाचे...नाही का ?
   
*संस्कार हे संस्कार असतात*

*स्वतः बदला आपली पिढी नक्की बदलेल*

गुरुपदेश

*गुरुपदेश.*

एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल.

*तात्पर्य :-*आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्टीत अर्थ-काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो.