Followers

Saturday, 29 May 2021

पाळी



पोस्ट थोडी मोठी आहे पण सर्वांनी थोडा वेळ काढून वाचा..
पुरुषांनी तर वाचाच पण महिलांनी हि वाचा..
अनेकांचा गैरसमज आहे कि पाळीत महिला खराब रक्त किंवा निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकतात.. तर असे मुळीच नाही कुठलं हि खराब रक्त किंवा निगेटिव्ह एनर्जी ती बाहेर टाकत नाही.. गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर टाकली जाणारी ती गर्भशयाची अंतत्वचा असते..
आणि त्याच गर्भात 9 महिने 9 दिवस संगोपन होत मग ते रक्त चांगलच असेल ना कि खराब असेल..?????
पाळी आल्यामुळे आज हि चांगली सुशिक्षित लोक तिचा विटाळ करतात.. तिला स्पर्श हि करत नाहीत, तिला मंदिरात जाऊ देत नाहीत, तिच्या साठी वेगळी भांडी, वेगळी चटई देतात..
म्हणजे ज्या वेळी तिला सर्वात जास्त प्रेमाची, आपुलकीची गरज भासते तेव्हा तिचा विटाळ केला जातो..
तुमच्या मते स्त्री - पुरुषा ची निर्मिती देवा नी केलीये मग मासिक पाळी ची निर्मिती हि देवानेच केली असणार ना ...?????
मग जर देवाला मासिक पाळी चालत नाही तर त्यानी ती स्त्री ला दिलीच कशाला..????
मासिक पाळी मुळेच एक नवा जीव जन्माला येतो आणि मग त्याचाच विटाळ करतो हे कितपत योग्य आहे..?????
आणि ह्याला अंधविश्वासी पाखंडी स्त्रीया हि तेवढ्याच जिम्मेदार आहेत..
बाईच्या स्पर्शाने विटाळणारा देव गाईच्या मुताने कसा काय शुद्ध होतो..????.
कधी कधी घरातील धार्मिक कार्यक्रमा मुळे घरातील स्त्री हि मासिक पाळी पुढे ढकलण्या च्या गोळया घेते.. जे कि निसर्गाच्या सरासर विरोधात आहे.. आणि ह्याचा त्रास पुढे तिलाच होतो.. ह्याचा त्रास असा कि तिची मासिक पाळी कायमची बंद होऊ शकते, तिला गर्भधारणा व्हायला त्रास होऊ शकतो किंवा कधी कधी गर्भधारणा होत हि नाही.. !
आणि अनेकदा स्त्रिया देव धर्माच्या नावावर उपवास ठेवतात आणि हा उपवास ठेऊन त्या दिवस-दिवस भर उपाशी राहतात.. आणि ह्याचे खूप वाईट पुढे दिसतात.. उपवास धरल्याने स्त्रीला तिच्या शरीराला आवश्यक असलेले घटक मिळत नाहीत आणि ह्या मुळे तिला डिलेव्हरी ला त्रास आणि बहुतांश वेळी डीफेक्टेड बाळ जन्मला येत जस कि बाळा ची एलिमेंटरी कॅनॉल नसले किंवा दुसरा एखादा अवयव नसणे किंवा डीफेक्टेड असणे ..
आणि असलेच उपवास धरून, बाहेरचे unhealthy food खाऊन, exercise न केल्याने, दैनंदिन तणावाने आज काल भरपूर मुलींना अनियमित पाळीचा त्रास होत आहे.. त्यांना PCOD म्हणजे Poly Cystic Ovarian Disease होत आहे.. ज्या मध्ये त्यांच्यात male हार्मोन च secretion वाढत आणि पाळी येत नाही ज्यानी त्यांच्या ovary वर cyst (पाळी न आल्यामुळे जमा झालेली अंडी ) form होतात..
ह्याच्या वर उपाय हि आहेत ( मुली - महिला मला या संदर्भात विचारण्या साठी इनबॉक्स ला मैसेज करू शकता )..
शेवट चा मुद्दा असा कि तुम्हाला माहित असेल.. आज हि खेड्या पाड्यात स्त्रिया पाळी आल्यावर कपडा वापरतात.. ज्यानी fungal infection होऊन गंभीर आजार होतात.. sanitary pad हि 4-5 तासात बदलली नाही कि तुम्हाला infection होत.. म्हणूनच प्रत्येक वर्षी भारतात
122, 844 स्त्रियांना गर्भशयाचा कैन्सर होतो आणि 67477 स्त्रियांचा ह्या कैन्सर मुळे जीव जातो..
ह्या सर्व गोष्टिना कारण म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा आहे.. ह्याला कारण म्हणजे ती गप्प आहे.. कोण आहेत ती लोक जी बोलतात 10 लेकर जन्माला घाला...?????
एक लेकरू जन्माला घातल्या वरच काय हालत होते ना हे तुमच्या आईला विचारा..
मुळात गडबड आहे ती इथल्या सडक्या मेंदूची,
बाईला केवळ भेगवस्तु म्हणून बघणाऱ्या घाणेरड्या मानसिकतेची,
आणि गरज आहे तिला विद्रोह करायची इथल्या
दांभिक वास्तवाविरुद्ध, सडक्या पुरुषी मानसिकते विरुद्ध, धर्माच्या आवडंबा विरुद्ध
आणि गरज आहे त्याने तिला समजून घेण्याची..
तिच्या मासिक पाळीला समजून घेण्याची.. !
(आवर्जून जास्तीत जास्त शेयर करा आणि आपल्या आई बहीण मैत्रीणींना जागृक करा)

No comments:

Post a Comment