Friendships ही छान, उत्तम मैत्रीचा दुवा आहे. वास्तविकत माणूस हा प्राणी असून तो समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. स्त्री आणि पुरुष लैंगिक आकर्षण हे नैसर्गिक बाब असली तरी कोणी कोणाला न दुखवता अमर मैत्री ठेवता येते. एक पत्नी आणि एक पती ही समाजाने तयार केलेली संस्कृती असली तरी काही समाजात बहुपत्नी आणि बहूपती पद्धत आहे. ती वेगवेगळ्या कारणांनी निर्माण झाली आहे. पण तसे मैत्रीचे नसते. असंख्य मित्र व मैत्रणी सध्या तरुण वर्ग वेगवेगळ्या social media असो किंवा जेथे काम करितात ती जागा असो किंवा जेथे लहानपणी शिकतात ती शाळा, महाविद्यालय येथे मुले मुली एकत्र शिकतात. मग असा ठिकाणी बोलणं चालणं होणारच विचार भावना एकमेकांना सांगणारच त्यात वावगे नाही. मैत्री अशी असावी की ती मरेपर्यंत टिकणारी असावी त्यात जिव्हाळा प्रेम सत्यता असावी. उगीच स्वतःच्या शारीरिक सुखाच्या ओढीने केलेली मैत्री नसावी. विश्वास प्रामाणिकपणा असावा.
No comments:
Post a Comment