🌹 *प्रमुख दत्तभक्त* 🌹
🌼 *गुळवणी महाराज* 🌼
*भाग १*
(सन १८८६-१९७४)
वामनरावांचे पिताजी दत्तभट गुळवंणी हे नारायणभटजींचे चिरंजीव. गुळवणी हे कोल्हापूर भागातील कौलवगावचे एक सदाचारसंपन्न मध्यमवर्गीय कुटुंब. वामनरावांच्या मातुश्री उमाबाई या जवळच्या पंचक्रोशीतल्या श्री. मारुतीपंत कुलकर्णी यांच्या कन्या. वामनरावजींचे मातापिता दोघेही विरक्त आणि महान्भगवद्भक्त होते. वाडीची वारी करण्याचा त्यांचा प्रघात होता.वामनरावांचा जन्म २३ डिसेंबर १८८६ गुरुवार रोजी कुडुत्री येथे झाला. *‘शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते’* या भगवदुक्तीप्रमाणे सदाचार संपन्न वैराग्यशील कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
वयाचे आठवे वर्षी उपनयनसंस्कार झाल्यावर वडील बंधूंनी संध्या, पूजा, वैश्वदेव, पुरुषसूक्त वगैरे धार्मिक आचारांचे शिक्षण दिले. कोल्हापुरात पं. आत्मारामशास्त्री पित्रे यांचेकडे रूपावली, समासचक्र, अमरकोश, रघुवंश ८ वा सर्ग, अजविलाप, पंचतंत्र वगैरे संस्कृत ग्रंथांचे अध्ययन झाले.वामनरावांना उपजतच चित्रे काढण्याचा नाद होता. १९०६-७ साली त्यांनी डॉइंगच्या दोन्ही परीक्षा दिल्या आणि थर्डग्रेड परीक्षेसाठी ते मुंबईस जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या कलासंस्थेत गेले. वामनरावांनी विवाह करून प्रपंच थाटावा या हेतूने वडील बंधू व मातोश्रींनी वामनरावांना सांगून पाहिले. पण विवाहसंस्कार व्हावा, सामान्यांप्रमाणे ते संसारी-प्रापंचिक गृहस्थ व्हावे असा विधिसंकेत नव्हता. अशाच काही दैवी घटना या तरूण २१ वर्षांच्या वामनरावांच्या जीवनात घडून आल्या.
१९०७ साली गुरुद्वादशीस स्वामी वासुदेवानंदसरस्वती महाराजांचा मुक्काम नरसोबाचे वाडीस होता. महाराजांनी याउत्सवात भाग घेऊन प्रसाद ग्रहण केला. या वेळी वामनराव कोल्हापूर मुक्कामी होते. ‘दत्ताचा एक फोटो व एक हार तयार करून वाडीस ये’ असा वडील बंधूंचेकडून वामनरावांस निरोप आला. त्याप्रमाणे ते फोटो व हार घेऊन आले. स्वामींचे दर्शन झाले. महाराजांना फोटो पाहून समाधान वाटले. त्या प्रसंगी वामनरावांना महाराजांचे हस्ते प्रसादयुक्त अशी एक हातात बांधण्यासाठी पेटी मिळाली. ती वामनरावांचे हातात सतत असे. गुरूंचा हा प्रथमदर्शनी मिळालेला प्रसाद एक शुभचिन्हच होते. वामनरावजींच्या सर्व जीवनास त्यामुळे कलाटणी मिळावी असा हा अभूतपूर्व योगायोग होता.मध्यंतरी प्लेगचा प्रादुर्भाव झाला. प्लेगने वामनरावांना झपाटले, ते दहा दिवस बेशुद्धावस्थेत होते. प्लेगची गाठ तशीच होती. श्रीगुरुचरित्राची पारायणे सुरूकेल्यावर गाठ फुटली व बरे वाटले. वामनरावांचा पुनर्जन्म झाला. श्रद्धा दृढ झाली. नंतर वाडीस येऊन माधुकरी मागून वामनरावजींनी श्रीगुरुचरित्राचे सात सप्ताह केले. श्रीगुरुकृपा फळाला आली.
श्रीगुरुदत्तात्रेयाचे ते निस्सीम उपासक झाले.या सुमारास पवनी या गावी श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांचा चातुर्मास झाला. वडील. बंधूंनी वामनरावांस मातोश्रींना घेऊन येण्याविषयी सांगितले. वामनराव पवनीस झाले आणि योगागोग असा की, महाराजांकडून अनंतचतुर्दशीच्या पुण्यदिवशी त्यांना अनुग्रह मिळाला. वामनरावजींच्या जीवनातला हा सुवर्णमंगल दिवस !
वामनरावजींनी मुंबईस नोकरीनिमित्त काही खटपट केली; पण जमले नाही. मग उपरती झाली. अंगावरील फक्त दोन वस्त्रे व लोटा घेऊन ते गाणगापुरास जाण्यास निघाले. वाटेत अत्यंत त्रास झाला. दौंडला कडक उपवास घडला. तो एकादशीचा दिवस होता. त्या दिवसापासून वामनरावांचे नित्याचे एकादशीव्रत सुरू झाले.गाणगापूर क्षेत्री श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू झाले. सातवे पारायण एक दिवसात केले. सात पारायणे संपवून सांगता केली. जवळ काही नव्ह्ते, म्हणून जवळची छत्री व वस्त्रे पुजार्यास देऊन सप्ताहाची सांगता केली. दृढभक्ती अंगी बाणली म्हणजे मनाचा ताबा शरीरावर केवढा बसतो व केवढे कार्य घडते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
गाणगापुरी श्रीगुरुचरित्राचे सप्ताह पुरे झाल्यावर गुरुदर्शनाची ओढ लागली. महाराज त्या वेळी हावनूर या भागात संचार करीत होते, असे समजल्यावरून वामनराव पायीच शोधार्थ निघाले. गाणगापुराहून पायीच हुटगी-विजापूर सतीमनी गाठले. धारवाडजवळील मथिहाळ दत्तमंदिरात महाराजांचा मुक्काम आहे. ही बातमी मिळताच ते गदगहून धारवाडला गेले. जवळ तिकिट काढायला पैसे नव्ह्ते, म्हणून घोंगडी होती ती विकून दोन रुपये मिळाले, ते तिकिटासाठी खर्च झाले.ते धारवाडला पोचले आणि स्वामीमहाराज तेथून पुढे संचारासगेले होते असे समजले ! मग पुढे पदयात्रा सुरू झाली.
गुरूचा शोध ही अंतरीची तळमळ प्रेरक ठरली व त्यापुढे कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यांना न जुमानता पुढील मार्ग सुरू झाला. गदग, हरिहर, तुंगभद्रा-संगमावरील कुडलीमठ, पुन्हा हरिहर, हुबळी, गदग, आंबेगिरी या गावी आले. प्रत्येक ठिकाणी महाराज येथे होते, पण येथून ते पुढे गेले अशी बातमी मिळे. मग ते मल्लापूर, बागलकोट, हावनूर या गावी गेले. हावनूर गावी महाराजांचा मुक्काम गावाबाहेर त्रिकुटेश्वरमंदिरात होता. महाराजांच्या दर्शनार्थ इतके दिवस तळमळणारे वामनराव या गावी आले आणि तडक मंदिरात जाऊन त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. ‘मी येथे आपली सेवा करून राहणार’ असा आग्रह वामनरावांनी धरला, एकभुक्त राहायचे, माधुकरी मागून उदरनिर्वाह करावयाचा व सदासर्वकाळ गुरुसेवेत घालवावयाचा, असा कार्यक्रम सुरू झाला. रोज तुंगभद्रेचे स्नान घडे. महाराजांच्या तोंडून गीतापाठ व ब्रह्मसूत्रवृत्ती ऐकायला मिळे.
महाराजांनी वामनरावांना गीता व विष्णुसहस्रनाम याची संथा स्वत: दिली. गुरूंचा अनुग्रह मिळाल्याने वामनरावांचे भाग्य दुणावले. आपले गुरू हे साक्षात् दत्तावतार आहेत, अशी साक्ष याचवेळी वामनरावांना पटली होती.महाराजांनी वामनरावांना या मुक्कामात आसने, प्राणायाम व अजपाजप या मंत्राची दीक्षा दिली. *'माझ्या आयुष्यातला हा सहवास परमभाग्याचा व आनंददायक’* असे वामनरावजी नंतरही सांगत.वामनरावांनी या मुक्कामात तुंगभद्रेचे एक सुंदर चित्र तयार केले. महाराजांनी त्रिपुरांतकेश्वरावर एक सुंदर काव्य रचिले होते. वामनरावांनी श्लोक हारबद्ध करून देवीच्या चित्राच्या गळ्यात तो हार घातला. महाराजांना फार समाधान झाले. वामनरावांनाही आपल्या कलेचे चीज झाले असे वाटले.त्यानंतर महाराज जेथे जेथे संचारास जातील तेथे तेथे त्यांचे समवेत वामनराव जात. सेवा कधी चुकली नाही-कधी अंतर पडले नाही.मधूनमधून वामनराव गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबरास जात. औदुंबरास सन १९१२ साली त्यांनी श्रीमालामंत्राचे पुरश्चरण केले. मातुश्री बरोबर होत्या.
श्रीक्षेत्र गरुडेश्वरी महाराजांचा मुक्काम असताना तेथे त्यांनी ब्रह्मसूत्रवृत्ती, दशोपनिषदे, श्वेताश्वतर, कैवल्यमौक्तिक ही उपनिषदे समजावून सांगितली. या मुक्कामात वामनरावांना महाराजांकडून ‘धोती’ची पद्धती शिकून घेता आली व दीक्षा मिळाली.टेंबेस्वामी यांनी एकमुखी दत्ताचे स्तवन केले होतेते असे :---
*मालाज्कमंडलुरध:करपद्मयुग्मे ।मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशूले ।यस्य स्त ऊर्ध्वकरयो: शुभशंखचक्रे ।वन्दे तमत्रिवरदं भुजषधकयुक्तम् ॥*
या ध्यानाप्रमाणे वामनरावांनी एकमुखी दत्ताचे सुंदर चित्र तयार केले, त्याप्रमाणे षोडश अवतारांपैकी सिद्धराज, अत्रिवरद, कालाग्निशमन, अवधूत, आदिगुरू लक्ष्मीनरसिंह, अशी सुंदर चित्रे तयार करून दिली. दत्तात्रेयाचे चित्र इतके सुंदर, भावपूर्ण, प्रसन्न आहे की, त्याच्या लक्षावधी प्रती आता घरोघरी दिसतात.
दत्तात्रेयांचे चित्र काढण्यास सुरुवात करण्यापूर्वी वामनरावजींना स्वप्नात दत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन झाले होते व त्याच भावावस्थेत हे प्रासादिक दत्तचित्र तयार झाले ! चित्रकलेची सार्थकता झाली !महाराजांच्या कृपेने महाराजांचे परमभक्त श्रीगांडाबुवामहाराज, श्रीगोविंदमहाराज पंडित, श्रीसीताराम महाराज यांचेशी वामनरावांचा सहवास घडला.
वामनरावांनी १९१७ ते १९२६ पर्यंत १० वर्षे बार्शी येथे म्युनिसिपल शाळेत व १९२६ ते १९४२ पर्यंत पुणे तेथे नू. म. वि. हायस्कुलात डॉइंग शिक्षक म्हणून काम केले.वामनराव हे एक उत्तम चित्रकार होते. पण कलेचा त्यांनी कधी व्यापार-बाजार केला नाही. साधुसंतांचे, देवादिकांचे, सद्गुरुमहाराजांचे अनेक फोटो त्यांनी काढले. चित्रे रंगविली, पडदा तयार करून दिला. क्रेपची फुले तयार केली व ती कला अनेकांना शिकवली. चक्रांकित कुंडलिनीचे एक सुंदर चित्र तयार करून त्यांनी उडुपीचे महाराजांना अर्पण केले.
*

No comments:
Post a Comment