*श्री क्षेत्र माचणूर*
अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज जेव्हा मंगळवेढा व आसपासच्या परिसरात वावरत असत, त्याकाळी त्यांचे वास्तव्य जेथे काही काळ झाले होते असे मंगळवेढ्याजवळील श्रीक्षेत्र माचणूर! भगवान श्रीसिद्धेश्वर महादेव, पंढरपूर येथीलश्रीविठ्ठलाच्या पदस्पर्शाने पुनित होऊन माचणूरच्या दिशेने प्रवाहितहोणारी भीमा नदी व नाथपंथी सिद्धांचे ठाणे असलेल्या या रमणीय स्थानी श्रीस्वामी समर्थ रमले यात नवल ते काय! धनकवडीचे श्रीशंकर महाराजांचे बालपणीचा काळसुद्धा याच क्षेत्री गेल्याचा उल्लेख प्रत्यक्ष श्रीशंकर महाराजांनी त्यांचे अंतरंग शिष्य श्री अप्पा धनेश्वर यांना स्वमुखाने सांगितलेल्या गोष्टीत केला आहे. ‘माझे आडनाव उपासनी असून सुमारे १८०० साली माझा जन्म मंगळवेढ्याजवळ झाला. बालपणी मी फार व्रात्य होतो. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी एकदा एका हरिणाचा पाठलाग करत असताना ते माचणूर येथील चंद्रभागेतीराजवळील जंगलात शिरले. मी तेथे गेलो तेव्हा एका शिवमंदिराजवळ गेलो. तेथून त्या हरिणास बाण मारणार तोच तेथे एक संन्यासी आला. त्याने त्या हरिणास आपल्या हातात उचलले व मला म्हटले, ‘‘बेटा, निरपराध प्राण्यास का मारतोस? शिकार करायची तर जंगली प्राण्यांची कर.’’ पण मी त्याच्याकडे लक्ष न देता हरिणास बाण मारला. पण तो त्याला लागताच बोथट होऊन खाली पडला. परत एकदा बाण मारला असता तसेच घडले. मी गोंधळलो. तेव्हा तो संन्यासी हसला, त्याने त्या हरिणास खाली सोडले व महाराजांस जवळ घेऊन कुरवाळले. तो संन्यासी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थमहाराजहोते.’ नंतर श्रीस्वामी समर्थमहाराज शंकर महाराजांस घेऊन तेथे सहा महिने राहिले, त्यांचेकडून साधना करून घेतली. त्यानंतर श्री स्वामींनी श्री शंकर महाराजांस तपस्येकरिता हिमालयात पाठविले. हिमालयातील काही कालाच्या तपस्येनंतर श्रीशंकर महाराज नगर जिल्ह्यातील वृद्धेश्वर येथे आले.’ असे हे श्रीक्षेत्र माचणूर!

No comments:
Post a Comment