🙏🏻🌹 *ज्ञान-वाणी* 🌹🙏🏻
*श्रीज्ञानेश्वरी अकरावा अध्याय*
॥ श्रीज्ञानेश्वर माऊलि समर्थ ॥
॥ *विश्वरूपदर्शनयोग*॥
पायां लागोनि बुझावणी ।
तुझ्या ठायीं शारङ्गपाणी ।
पाहिजे ऐशी करणी ।
बहु केली आम्हीं ॥ ५४६ ॥
हे शार्ङ्गपाणि भगवंता ! खरोखर तुझ्या पाया पडून व क्षेमकरितां तुझी याचना करून, तुझे सांत्वन केले पाहिजे, अशा प्रकारची वागणूक माझ्याकडून फार झाली.
सजणपणाचिया वाटा ।
तुजपुढें बैसें उफराटा ।
हा पाडु काय वैकुंठा ? ।
परि चुकलों आम्हीं ॥ ५४७ ॥
सोयरेपणाच्या नात्याने तुझ्याकडे पाठ करून बसत असे, भगवंता ! हे योग्य होते काय ? पण आम्ही चुकलों.
देवेंसि कोलकाठी धरूं ।
आखाडा झोंबीलोंबी करूं ।
सारी खेळतां आविष्करूं ।
निकरेंही भांडों ॥ ५४८ ॥
देवा ! तुमच्याबरोबर दांडपट्टा खेळलों, आखाड्यात तुमच्याशी झोंबाझोंबी केली. सोंगट्या खेळतांना खोटे दान देत असूं आणि हातघाईवर येऊन, तुमच्याशी भांडतही असूं.
चांग तें उराउरीं मागों ।
देवासि कीं बुद्धि सांगों ।
तेवींचि म्हणों काय लागों ।
तुझें आम्ही ॥ ५४९ ॥
जी चांगली वस्तु असेल, ती बळजबरीने मागत असू. सर्वज्ञ अशा तुला शहाणपण सांगत असू त्याचप्रमाणे केव्हा 'आम्ही तुझे काय लागतो' असेहि म्हणत असूं.
ऐसा अपराधु हा आहे ।
जो त्रिभुवनीं न समाये ।
जी नेणतांचि कीं पाये ।
शिवतिले तुझे ॥ ५५० ॥
असे त्रैलोक्यांत मावणार नाही इतके अपराध माझ्याकडून झाले आहेत; पण देवा ! हे सर्व अज्ञानामुळे घडले आहेत, हे तुझ्या पायाला स्पर्श करून सांगतो.
*॥जय जय रामकृष्ण हरि॥*

No comments:
Post a Comment