Followers

Sunday, 30 April 2017

सूंदर लेख

.         सूंदर लेख:
By
S G PAWAR STUDY CENTER SPOKEN ENGLISH ACADEMY And Coaching Classes

☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.

अचानक तोल गेला,

कप सांभाळत पडल्यामुळे,

हाताच्या कोपराला लागले.

कपही फुटला.

जर मी कप सोडला असता,

तर लागले नसते.
आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.

शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.

गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.
🔸 मला विचारलच नाही;

🔹 मला Good morning केले नाही;

🔸 मला निमंत्रणच दिलं नाही;

🔹 माझं नावंच घेतलं नाही;

🔸 माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत;

🔹 माझा फोन घेतला नाहीं ;

🔸 मला बसायला खुर्चीच दिली नाही;

🔹 मला मानच दिला नाही.

🔸 सोडुन द्या हो!

🔹 सोडायला शिकलं कि मग पहा,

🔸 निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.

🔹 सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.  तो सोडता आला कि झालं.
✍ तो लगेच सोडता येणार नाही.  पण कठिणही नाही.  प्रयत्न करायला काय हरकत आहे.  लक्षात ठेवा एकदा का जर नात्यात क्लिष्टता निर्माण झाली की ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तिच्या मनातून कायमचे उतरता.
💐💐 *खास सर्वांना* 💐💐

No comments:

Post a Comment