Followers

Sunday, 23 April 2017

Savata mali

उद्या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चंदन उटी दिनानिमित्त विनंम्र अंभिवादन
कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।।
लसूण मिरची कोथिंबिरी। अवघा झाला माझा हरी ।।
विहीर, दौरी मोट, नाडा,। अवघी व्यापिली पंढरी।।
सावता म्हणे केला मळा। विट्ठल पायी गोविला गळा।।
     संत सावता महाराज हे कधीही पंढरपूरला गेले नाहीत. या उलट पांडुरंग ज्ञानदेव, नामदेव हे सर्व सावता महाराजाच्या मळ्यात त्यांना भेटण्यासाठी आले होते ते म्हणतात आपल काम निष्ठेने इमानदारीने केल्यास त्यांना शेतामधील पिकांमध्ये पांडुरंग दिसतो. असा अगाद महिमा सावता महाराजाचा असल्यामुळे त्यांच्या या जन्मभुमी कर्म भुमी समाधी असलेल्या अरण गावात शासनास आवाहन करताना शंकरराव लिंगे म्हणतात, अरण गावास ‘अ’ वर्ग तीक्ष क्षेत्राचा दर्जा द्या. अस्तित्वात असलेले मंदीर ट्रस्ट बरखास्त करून शासकीय समिती नेमा. सावता महाराज यांनी वन औषधी देऊन गावातील लोकांचे रोग बरे केले होते, म्हणून संत सावता महाराज यांच्या नावाने वन औषधी संशोधन केंद्र करा. त्यांच्या नावाने कृषी विद्यापीठ काढून अरण तीर्थ क्षेत्राचा सर्वागिक विकास करा. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील माळी समाजातील दहावी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी केलेल्या अमानुष बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवून पिडीत परिवारास मदत देण्याचे आवाहन केले. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले या दाम्पंत्यास भारतरत्न पुरस्कार द्या. किंवा नविन विश्वरत्न सारखा पुरस्कार निर्माण करून फुले दाम्पंत्यास प्रथम द्या. पुणे येथील भिडेवाड्यात महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. तो वाडा शासनाने आरक्षित करून सावित्रीमाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करा. महात्मा फुले यांचे गुरू छत्रपती शिवाजी महाराज, शिष्य भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणेच महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक मुंबईत करा. शेतक-यासाठी वीज पाणी, खते, बी-बीयाणे, मोफत द्या. स्वामीनाथन आयोग लागु करा. नच्चेपण कमिटी लागु करा. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा. ओबीसीनां तिसरी सुची लागु करून लोकसंख्येच्या प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय (ग्रामपंचायत पासुन संसदेपर्यत) आरक्षण लागु करा. ओबीसी मंत्रालयाचा मंत्री ओबीसीचाच करा. ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतुद करा. बार्टीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करा. ओबीसीनां जाचक क्रिमीलेहरची अट रद्द करा. अॅट्राॅसिटीची व्याप्ती वाढवून ओबीसी समाजातील लहान जातीना एस.सी. प्रमाणे सौरक्षण द्या. इ. प्रलंबित मागण्या अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सावता महाराज यांच्या चंदन उटीच्या दिनानिमित्त शासनास केल्या आहेत.

No comments:

Post a Comment