🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌻🌻।। नामसमाधी ।।🌻🌻
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
★★
**************************
★ नामाच्या अभ्यासाच्या तीन पायर्याआहेत .
पहिली पायरी ---नामाला काहीतरी दृष्य आधार घेतल्र्याशिवाय नाम घेता येत नाही . उदा. आसन घालणे , विशिष्ट जागा लागणे , ठरलेली वेळ होण , स्नान करणे , हातात माळ घेणे , उदबत्ति थूप लावणे , समोर सद्गुरूचे चित्र ठेवणे , पादुका ठेवणे , स्तोत्रे अवा अभंग मोठ्याने म्हणणे , नामसंकीर्तन करणे म्हणजे नाम मोठयाने म्हणणे , इतर नामधारक बरोबर घेणे , आजुबाजुला अगदी शांतता लागणे , प्रकृती बरी असणे , इतर संसारी कटकटी नसणे या सगळ्या नामाच्या उपाधि आहेय . त्या असल्या तरी वाहवा नसल्या तरी वाहवा .
★ दुसरी पायरी --- डोळे व तोंड बंद ठेवून नाम घता येते .नाम घेतांना मन इकडे तिकडे धावते .ह्रदयात सद् गुरूचे चरण धरावे . मन त्यावरून उडाले तरी नाम चालू ठेवावे .मन मधूनच परत यते .नामाची चिकाटी ठेवली तर मनाची स्थिरता वाढते .पुढे पुढे मन धावले तरी त्यास परत आणण्यास कष्ट पडत नाहीत .हा अभ्यास सिध्द झाला असे केव्हा म्हणावे ? ,तर नाम घ्यायला बसले की मन चटकन नामाभोवती गोळा होते तेव्हा . इतकेच नव्हे तर बाहेर गडबड -गोंधळ चालू असून मन मग नामाला सोडून भटकत नाही .बाहेरचा कोणताही आधार न घेता नामाला बसले की मन नामाभोवती गोळा होते .
★ तिसरी पायरी ---नित्यनियमाप्रमाणे नामाला बसल्यावर नाम सुंदर चालतेच पण नियम आटोपल्यावर संसारातील व्यवहार होत असता नामाचा आतील प्रवाह जसाच्या तसाच चालतो . जातायेता , देता घेता , खाता पिता , चालता बोलता , नामात खंड पडत नाही .सद् गुरूचे सानिध्य प्रत्यक्ष भासू लागते .नामाचा प्रवाह व
सद् गुरूचे अनुसंधान हे दोन्ही प्रवाह समांतर चालतात .मधेच प्रेमवृत्ति उदय पावून दोन्ही प्रवाह एकमेकात मिसळतात . मनाला एक विलक्षण शांतपणा वाटतो . प्रथम ती शांती फार वेळ टिकत नाही .पण तिची किंमत फार मोठी असते . मोठे दु:ख अंगावर कोसळले तरी नामधारक आतून विचलित होत नाही . स्वरूपशांतीचा हा अनुभव नामाची चटक वाढवूनच जातो .
🌻🌻🙏🙏🙏🌻🌻

No comments:
Post a Comment