Followers

Tuesday, 25 April 2017

Moral story

गाढव वाघाला बोलतो गवत पिवळ असत. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरव असत. त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला. दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांना समोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळ असत आणि हा वाघ बोलतो कि हिरव असत तुम्ही आता सांगा कि खर काय आणि खोट काय. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांन समोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत पिवळ असत.आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने माकडउड्या मारत जंगलात निघून जात.
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो कि तुम्हाला माहित आहे ना कि गवत हिरव असत तरीही का मला शिक्षा केली.सिंह बोलला कि मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली.
*Moral of the Story :ध्येय गाठायच असेल तर वाटेत येऊन भुकणाऱ्या कुत्र्यांन कडे दगड न फेकता बिस्कीट फेका.आणि पुढे व्हा कारण पुढे वाटेत असे भरपूर कुत्री भेटणार आहे. ध्येय महत्वाचं आहे कुत्र्यांन बरोबरचा वाद नाही..!*☝👌

No comments:

Post a Comment