By
HTTP://sgpawarstudycenter.blogspot.in
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आयु.रत्नाकर गायकवाड यांचे वर आैरंगाबाद येथे शासकीय विश्रामगृहाच्या आवारात भारिप च्या कार्यकरत्यांनी जो प्राणघातक हल्ला केला त्याचा मी एक समाजबांधव व समाज सेवक म्हणून निषेध करतो.साहेबांसोबत असलेल्या त्यांच्या सुविद्य सहचारिणीस देखिल इजा झाल्याचे वाचुुन दुःख झाले.आमच्या मध्ये एकी नाही म्हणुन की नासिक,पुर्णा सारखे प्रसंग आमच्या बांधव,भगिनिंवर सवर्णांकडुन दिवसाढवळ्या अत्याचार केले जातात.आमचे दैवत डॉ.बाबासाहेब आम्बेडकरांची जाहिररित्या विटंबना होते.आमच्या बंधु भगिनी ना सवर्णांकडुन झालेल्या हल्ल्यात शारिरिक नुकसान झालेले असते.मग आम्ही सनदशिर मार्गाने मोर्च्या काढुन गुन्हेगारांना कायदेशिर रित्या ( कडक ? ) शासन करण्याची मागणी करतो.अश्या हल्यात कोणाचे डोळे तर पोटचा गोळा गमविला जातो.तुमच्या मोर्च्याने ते परत येत नाही.गवई बंधुंच्या डोळे काढल्यांपासुन नामांतर इ.आजतागात
अनेक मोर्चे मी अनुभवले .बाबासाहेबांनंतर आमच्या त गटा तटाचे राजकारण आले .पण आम्ही आमच्या बांधवांनाच संघटितपणे मारहाण करुन जाहिरपणे इतर समाजाच्या टिकेचे टवाळिचे समाज चळवळ लक्ष्य बनते.आयु .रत्नाकर गायकवाड यांचेशी २५ वर्षापुर्वी माझा संबंध आलेला होता. त्यांच्या समजाबद्दल प्रशासकीय कार्याचा मला जो अनुभव आला तेव्हापासुन मी त्यांचा प्रशंसक आहे.डॉ.बाबासाहेब आम्बेडकर भवन हे काही एका दिवसात पाडले गेले नाही.आपल्या पैकी अनेकांनी या भवन ला भेट दिलेली असेलच.ते पावसाच्या गळण्यने अगदी जीर्ण झालेले होते. भवनाची ही जागा बाबासाहेबानी लोकवर्गणितून विकत घेवुन ,समाजासठी न्यास निर्माण करुन कुटुंबियांवितिरिक्त समाज बांधवाकडे दिला. कायद्याने ट्रस्ट हे त्याचे व्यवस्थापक ठरतात.ती वस्तु तोडणयाचे अथवा नवीन वास्तु उभी करण्याचे अधिकार ट्रस्टींचे असतात. ट्रस्टिंनी आयु.रत्नाकर गायकवाड सारख्या निष्णत व्यक्ति स प्रमुख सल्लागार पद नियुक्त करून बाबासाहेबांच्या कल्पनेतील भव्य असे डॉ बाबासाहेब आम्बेडकर भवन ऊभारण्यासाठी तत्संबंधित सर्व रिपोर्ट ,परवाने प्राप्त करून ट्स्टिंची सम्मती घेणे इ.काम आयु.रत्नाकर गायकवाड साहेबांनी पार पाडले.यात त्यांचा काय वायक्तिक आकस आहे हे त्यांच्या विरुद्ध गहजब करणार्यांनी सांगितले तर आमच्या बुध्दिस पटेल.राहिला प्रश्न आम्बेडकर कुटुंबियांच्या हक्काचा.हा वाद संबंधित ट्रस्टी नाकारत नाही .आणि आपल्या समाजातील कोणीही माईचा लाल ते उभ्या आयुष्यात नाकारु शकत नाही ही दगडावरची लकीर आहे.म्हणुन कुटुंबियानी सर्व ट्रस्ट ताब्यात घेणेही बाबासाहेबांच्या विचारसरणी च्या विपरित आहे.आता विद्यमान ट्रस्टी हे कायदेशिर आहे की नाही हा वाद मा.आयुक्त [ विश्वस्त] यांचे न्यायालयात प्रलंबित आहे.शेवटी मा रत्नाकर गायकवाड साहेब यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत समाज सेवेचे ऊल्लेखनिय काम केल्याचे या पुर्वीच्या पोस्ट वरुन दिसुन येते.या संदर्भातील ट्रस्ट ची कागदपत्रे व वेबसाइट बंघितल्यास संबंधित बाबी लक्षात येतात.पण लक्षात कोण घेतं ?......
HTTP://sgpawarstudycenter.blogspot.in
No comments:
Post a Comment