Followers

Sunday, 23 April 2017

Poem

मातृ म्हणा मदर म्हणा
*आई* शब्दात जीव आहे .

पिता म्हणा पप्पा म्हणा ,
 *बाबा* शब्दात जाणीव आहे.

सिस्टर म्हणा दीदी म्हणा
 *ताई* शब्दात मान आहे .

फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा
 *मित्रा* शब्दात शान आहे.

एन्ड म्हणा फिनिश म्हणा
 *अंत* शब्दात खंत आहे .

दिवार म्हणा,  वॉल म्हणा
 *भिंत* शब्द जिवंत आहे.

रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा
 *नातं* शब्दात गोडवा आहे .

एनिमी म्हणा, दुश्मन म्हणा *वैर* शब्द जास्त कडवा आहे .

हाय म्हणा, हॅलो म्हणा,
*हात* जोडणे संस्कार आहे .

अतिथी देव मानून करतो
 *नमस्कार* आहे .

आंग्ल लिपी शिकून झाले
 बुद्धीचे *खिंडार* आहे .

अ ते ज्ञ शब्दात  ज्ञानाचे
 *भांडार* आहे .

सर म्हणा, मॅडम म्हणा,
*गुरु* शब्दात अर्थ आहे .

गूण रूप देणारा दाता
निस्वार्थ आहे .

ग्रँड पा ग्रँड माँ शब्दात
काही मजा नाही .

आजोबा,आणि आजी सारखे
 *नाते* सुंदर जगात नाही .

गोष्टी सर्व सारख्या पण
 *फरक* फार अनमोल आहे .

मराठी भाषेचा अर्थ जेवढा कळेल तेवढा *खोल* आहे.

No comments:

Post a Comment