Followers

Monday, 24 April 2017

Pravachan 1

खरंच...
सद्गुरू कित्ती छान सांगतात...

कुटुंबप्रमुख पुरुषाला वाटतं की "मी कमवतोय म्हणुन घरातली माणसं जीवन जगतायेत."

पण खरं तर सद्गुरू सांगतात की "तसं नाहीए. घरातली माणसं जगावीत या देवाच्या इच्छेमुळे  तुझी कमाई चालु आहे. त्यांना टाकुन दे मग तुझी कमाईच खाली गडगडेल. अधोगती होत जाईल."

घरच्या बाईला देखिल वाटतं की "मी कामं करते म्हणुन घरातली माणसं जेवतात, धुतलेले कपडे घालतात वगैरे वगैरे."

पण सद्गुरू सांगतात की "त्यांच्यासाठीच तुला शक्ती दिलीय. चांगलं आरोग्य दिलंय. त्यांना टाकशील तर राहिल का आरोग्य जागेवर?"

खरंय...
आपल्या घरातल्यांच्या नशीबाची आपल्याला साथ असते म्हणुन आपण प्रगती करत असतो.कमवत असतो.कामे करत असतो. हे त्यांचे आपल्यावरच ऋण असते. पण आपण त्यांच्यावरच उपकार केल्यासारखं फिल करत असतो.

म्हणुन यापुढे असा विचार करायला लागेल की ""घरातल्या माणसांना मी सांभाळत नाहीये, तर घरातल्या माणसांसाठी सद्गुरूनी मला आत्तापर्यंत सांभाळलंय."

सद्गुरूबोधाने गैरसमजांचा व अहंकाराचा कचरा दूर होऊन दृष्टीकोन स्वच्छ होतो.
जय सद्गुरू.

No comments:

Post a Comment