Followers

Monday, 24 April 2017

Shiv

शिव या शब्दाची उत्पत्ती'शिव' या शब्दाविषयी काही माहिती करून घेऊया.'शिव' हा शब्द `वश' या शब्दापासून अक्षरांच्या उलटापालटीने तयार झाला आहे. वश् म्हणजे प्रकाशणे. म्हणून जो प्रकाशतो तोशिव. शिव हा स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशी आहे. तो स्वत: प्रकाशित राहून विश्‍वालाही प्रकाशित करतो. शिव म्हणजे मंगलमय व कल्याणस्वरूप असे तत्त्व. शिव हा सत्त्व, रज व तम या तिघांना (त्रिगुणातीत करणारा) म्हणजेच अज्ञानाला एकत्रितपणे नष्ट करतो.शिवाची इतर नावेशंकर : शं करोती इति शंकर: । शं म्हणजे कल्याणव करोती म्हणजे करतो. जो कल्याण करतो, तो शंकर होय.महाकालेश्वर : अखिल विश्वब्रह्मांडाचा अधिष्ठाता देव (क्षेत्रपालदेव)हा काळपुरुष म्हणजेच महाकाळ आहे. म्हणून याला महाकालेश्वर म्हणतात.महादेव : परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण ज्ञान व परिपूर्ण साधना हे तीनही ज्याच्यात एकत्र आहेत, अशा देवास देवांचा देव म्हणजेच महादेव म्हणतात.भालचंद्र : भाली म्हणजे कपाळी ज्याने चंद्र धारण केला आहे तो भालचंद्र. शिवपुत्र गणपतीचेही भालचंद्र हे एक नांव आहे.कर्पूरगौर : शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे, म्हणून त्याला कर्पूरगौर असेही म्हणतात.नंदीच्या उजव्या बाजूला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) व अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावेत. दोन्ही शिंगे व त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे. शिंग हे अहंकार, पौरुष व क्रोध यांचे प्रतीक आहे. शिंगांना हात लावणे म्हणजे, अहंकार, पौरुष व क्रोध यांवर ताबा ठेवायला शिकणे.पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेतांना पिंडी व नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी व नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे रहाणे पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची पद्धतशिवाकडून येणार्‍या शक्‍तीशाली सात्त्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणार्‍याला थेट शिवाकडून लहरी मिळत नाहीत; त्यामुळे त्याला शिवाकडून येणार्‍या शक्‍तीशाली लहरींचा त्रास होत नाही. येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाकडून येणार्‍या लहरी सात्त्विकच असल्या, तरी सर्वसाधारण व्यक्‍तीची आध्यात्मिक पातळी जास्त नसल्याने त्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता तिच्यात नसते त्यामुळे त्या लहरींचा तिला त्रास होऊ शकतो. या कारणासाठीच सर्वसाधारण व्यक्‍तीने पिंडीचेदर्शन घेतांना पिंडी व नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी व नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे रहावे.शंकराच्या पिंडीवर फक्‍त गार पाणी व बेल वहातात. दूध, हळदकुंकू या वस्तू शंकराच्या पूजेत वापरत नाहीत. पिंडीतील पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहातात. वहातांना बिल्वपत्र पिंडीवरउपडे ठेवून देठ आपल्याकडे ठेवतात. कारण तीन पानांतून एकत्र येणारी शक्‍ति आपल्याकडे यावी, हा त्यातील उद्देश असतो.शिवाची काही वैशिष्ट्येनागशिवाच्या अंगावर ९ नाग असतात. शंकराच्या डोक्यावर एक, गळयात एक, दोन दंडात प्रत्येकी एक दोन, मनगटात प्रत्येकी एक, कमरेत एक व दोन मांड्यात प्रत्येकी एक अशा नऊ ठिकाणी हे ९ नाग असतात.गंगाशिवाच्या डोक्यातून गंगा वहाते. गंगा म्हणजे ज्याच्यापासून गमन करतात असा ओघ. म्हणजे गं ग- गंगा यालाच शिवाच्या डोक्यावरून गंगा अवतरली असे म्हणतात. पृथ्वीवरील गंगा नदीत या आध्यात्मिक गंगेचेअंशात्मक तत्त्व असल्याने प्रदुषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पावित्र्य कायम टिकते, म्हणूनच विश्‍वातील कोणत्याही जलाशी तुलना केली, तर गंगाजल सर्वांत पवित्रआहे, असे जाणवते.त्रिनेत्रशंकर त्रिनेत्र आहे. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला, उजवा डोळा म्हणजे दुसरा दुसराडोळा व भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्म-रूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय.यामुळेच शंकर भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्य काळ या त्रिकालातील घटना पाहू शकतो.चंद्रशिवाच्या कपाळी अर्धचंद्र असतो. मानवरूपातील शिवाच्या हातात पुढील चार आभूषणे असून ती प्रतिकात्मक आहेत.१. डमरू२. त्रिशूळ३. पाष किंवा मृग४ परशु.तांडवनृत्यशिवाच्या दोन अवस्था मानल्या आहेत. त्यांतील एक समाधि अवस्था व दुसरी तांडव किंवा लास्य नृत्य अवस्था. लास्य नृत्यामध्ये हात मोकळे असतात व वेगवेगळया मुद्रा केल्या जातात. तंडून करून दाखवले ते तांडव, असे जाणून भरतादि मुनींनी ते नृत्य मानवांना शिकवले.नंदीनंदी म्हणजेच आनंदी. वृषभरूपातील नंदी हे शिवाचे वाहन आहे. त्याला शिव परिवारात महत्त्वाचे स्थान आहे. शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते.महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करण्याचे कारणउपवास म्हणजे उप + वास, म्हणजे सतत भगवंताचे स्मरण करणे. त्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची पूजा करून त्याची आराधना करतात. त्यामुळे आपल्यात जास्तीतजास्त शिव तत्त्व येण्यास मदत होते. सर्वशक्‍तिमान अशा देवतांचे आशिर्वाद मिळण्यासाठी आपण त्यांची उपासना करतो. आज आपण विज्ञानयुगात रहातो. त्यामुळे प्रत्येक गोष्टी मागे असलेले शास्त्र जाणून घेऊन आपण सर्वजण कृति करूया. शास्त्र लक्षात येण्यासाठी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करून पाहून त्याची अनुभूति घेणे शक्य होते. त्यामुळे मुलांनो, आपण हे सगळे डोळसपणे समजून घेऊया. सांगितल्याप्रमाणे केल्यास त्याविषयी आपल्याला कळेल.पाण्याची धारपिंडीत शिव-शक्‍ति एकत्र असल्याने प्रचंड उर्जा निर्माण होते. तिचा पिंडीच्या कणांवर व दर्शनाला येणार्‍या भक्‍तांवर विपरित परिणाम होऊ नये, म्हणून पिंडीवर पाण्याची सतत धार पडेल, असे करतात.भस्मभस्म म्हणजे राख. भस्म हे लयाचे दर्शक असल्याने ते लावतात.शाळुंकेची पूजाशाळुंकेवर भस्माचे तीन आडवे पट्टे ओढतात व त्याच्यावर एक वर्तुळ काढतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित् गहू व पांढरी फुले वहातात. पांढरा रंग हे पावित्र्याचे लक्षण आहे.शिवाला पांढरी फुले व बेल वहाण्यामागचे शास्त्रपांढर्‍या रंगाच्या फुलात व बेलाच्या पानातवातावरणातील शिव तत्त्व खेचून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे शिवाच्या पूजेत बेलाची पाने व पांढर्‍या रंगाची फुले वापरतात.प्रदक्षिणाशिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तरदिशेकडे, म्हणजे सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्हणजे नाला जातो, त्याला सोमसूत्र म्हणतात. प्रदक्षिणा घालतांना डाव्या हाताने जायचे आणि अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी ऊर्फ नहाळ (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते, तेथपर्यंत जाऊन तो न ओलांडता परत फिरायचे आणि पुन्हा पन्हाळीपर्यंत उलटे येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची. हा नियम शिवलिंग जर मानवस्थापित किंवा मानवनिर्मित असेल तरचलागू असतो; स्वयंभू लिंगास तसेच चल लिंगास (घरातील लिंगास) हा नियम लागू नाही. शाळुंकेच्या स्रोताला ओलांडत नाहीत, कारण तेथे शक्‍तीस्रोत असतो.

No comments:

Post a Comment