Followers

Sunday, 23 April 2017

Shelipalan

शेळीपालनातून दीड कोटी रुपये
By S G PAWAR STUDY CENTER

शेळ्यांच्या विक्रीतून वर्षाकाठी 1 कोटी 48 लाख रुपये, शेळीच्या दूध विक्रीतून 2 लाख 40 हजार रुपये, लेंडीखताच्या विक्रीतून 2 लाख रुपये आणि शेळीपालन कसं करावं हे शिकवण्याच्या ‘फी’तून 12 लाख रुपये. अशक्यप्राय वाटणारं हे उत्पन्न युवा शेतकरी मिळवत आहेत.

20 शेळ्यांपासून व्यवसाय सुरु झाला. हळूहळू शेळ्या वाढल्या. एक-एक करत तब्बल 13 जातीच्या शेळ्या शेडमध्ये आल्या. 13 जातींसाठी वेगवेगळी कंपार्टमेंट तयार केली. करडं, शेळ्या आणि बोकडांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. करडांची विक्री सुरु केली.

20 शेळ्यांपासून सुरु झालेल्या या व्यवसायाची आज कंपनी झाली आहे. आज इथे सिरोही, सोजत, उस्मानाबादी, बोअर, बीटलसह 13 जातीच्या तब्बल 750 शेळ्या आहेत.

शेळयांचा प्रकार आणि अवस्थेनुसार त्यांनी विभाग केले आहेत. गाभण, व्यायलेल्या शेळ्या, ब्रीडिंगचा नर, मादी आणि नर करडं, खाट्या शेळ्यांसाठी वेगवेगळे आठ विभाग केले आहेत. शेळ्यांना दिवसातून तीन वेळा सुका, हिरवा आणि खुराक दिलं जातं. त्याचबरोबर नियमितपणे औषधोपचार केला जातो. प्रत्येक शेळीला टॅग लावल्याने त्यांची जन्मकुंडलीच कळते.
गोट ब्रीडिंगचं अर्थशास्त्र

ब्रीडिंगच्या शेळ्या – 750
14 महिन्यात – 2,250 करडं विक्री
एका करडाचं वजन – 22 किलो
एकूण करडाचं वजन – 49,550 किलो
प्रती किलो – 300 रुपये दर
करडाचं उत्पन्न – 1 कोटी 48 लाख 50 हजार
दूध आणि लेंडी – 4 लाख 40 हजार
प्रशिक्षण – 9 लाख
एकूण उत्पन्न – 1 कोटी 61 लाख 90 हजार
उत्पादन खर्च – 51 लाख 60 हजार
निव्वळ उत्पन्न – 1 कोटी 10 लाख

पारंपारिक शेळी पालन न करता त्यांनी गोट ब्रीडिंगचा व्यावसाय केल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तंत्रज्ञान, प्रशिक्षण कार्पोरेटचा टच दिल्याने जिथे गवतही उगवत नव्हतं, तिथे कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न मिळतं आहे.



No comments:

Post a Comment