Followers

Sunday, 23 April 2017

2

एकदा गंगेला विचारण्यात आले. तुझ्या पाण्यात आंघोळ केली कि सर्व पापे धुतली जातात.
त्या सर्व पापांचे तु काय करते?
ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते.
समुद्राला विचारण्यात आले.
तु त्या पापांचे काय करतो?
समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो.
ढगाला विचारले.. तु काय करतो त्या पापांचे?
ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरुपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो.
लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार.
भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा.
समाधानी रहा..
ठेवले अनंते तैसेची रहावे चित्ति असु द्यावे समाधान..
           
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

No comments:

Post a Comment