Followers

Sunday, 23 April 2017

Chinta VA kalji

काळजी करणे हा माणसाला जडलेला एक रोग आहे. काळजी करण्यासारखी परिस्थिती असली तर माणूस काळजी करतोच,

पण काळजी करण्यासारखी परिस्थिती नसली तरी माणूस काल्पनिक भयगंडाच्या आहारी जाऊन काळजी करीत बसतो.

भुंगा जसा लाकूड पोखरतो त्याप्रमाणे काळजीरुपी भुंगा माणसाचे जीवन पोखरीत असतो.

काळजी करण्याने नसलेले रोग सुद्धा निर्माण होतात. बुडत्याचा पाय जसा खोलात जात असतो, त्याप्रमाणे काळजी करणा-यांची परिस्थिती अधिकच बिकट होत असते.

म्हणून कुठल्याही परिस्थितीत काळजीला सोडचिठ्ठी देणे अत्यंत आवश्यक आहे.

               
     🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

      ...................................

No comments:

Post a Comment